ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला , वट हुकमावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची स्वाक्षरी



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 जिल्हा परिषद, पंचायत समिती पाठोपाठ राज्यातील महापालिका, नगरपालिकेत ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक नागरी संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण ठेवण्याच्या वट हुकमावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर तसा वटहुकूम जारी करण्यात आला आहे.त्यामुळे आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत ओबीसींना 27 टक्क्यांपर्यंत आरक्षण मिळणार आहे.

राज्यातील स्थानिक नागरी संस्थांमध्ये एकूण राजकीय आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, अशी सुधारणा करण्यास गेल्या आठवडय़ात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती.

यासंदर्भातील वटहुकमावर राज्यपालांची दोन दिवसांपूर्वी सही झाली. त्यानंतर याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिकेत ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम राहणार आहे. याआधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील वटहुकमावर राज्यपालांनी 23 सप्टेंबरला सही केली होती.

दरम्यान, मुंबईवगळता राज्यातील अन्य महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबविण्यास राज्यपालांनी 30 सप्टेंबरला मंजुरी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post