एसटी महामंडळाच्या कामगार संघटनांनी बेमुदत उपोषण राज्यभरात सुरू .



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

राज्यात अनेक मागण्यांसाठी बुधवार पासून एसटी महामंडळाच्या कामगार संघटनांनी बेमुदत उपोषण राज्यभरात सुरू केले आहे.या पुढेही उपोषण सुरूच राहणार असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी बोलताना स्पष्ट केले.

राज्य मार्ग परिवहन मंडळाची बिघडलेली आर्थिक घडी, तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे अनिश्चित वेतन, कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, प्रलंबित महागाई भत्ता अशा अनेक मागण्यांसाठी परिवहन मंत्र्यासोबत पार पडलेल्या बैठकीतही कोणताही तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे.

बुधवार सकाळ पासूनच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या दिवाळीपूर्वी मान्य व्हाव्यात, यासाठी एसटीच्या विविध कामगार संघटनांनी एकजूट दर्शवते बेमुदत उपोषण सुरू केले. गेल्या मागील दीड वर्षापासून एसटीचा आर्थिक डोलारा पूर्णतः ढासळला असून प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यात डिझेलच्या किमती वाढल्याने एसटी बसचा दैनंदिन खर्च भागवणेही कठीण होत चालले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मागील वर्षभरापासून राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे.

बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक, महाराष्ट्र एसटी कामगार सेना व कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. डिझेलच्या वाढलेल्या किमती, तसेच राज्य शासनाकडून मिळणारी तुटपुजी मदत, त्यात दिवाळीनंतर मार्ग काढू असे म्हणून सद्यस्थिती आणखी विदारक होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात एसटी सेवा बंद होऊन वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, असेही तिगोटे यांनी यावेळेस स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post