उदयकाळ फाउंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण बागुल यांच्या हस्ते लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

  Version 1 कंपनी आणि स्नेह फाऊंडेशन व उदयकाळ फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली व केसनंद परिसरातील १०० गरीब व गरजू लोकांचे कोविल्डशिल्ड लसीकरण करण्यात आले. उदयकाळ फाउंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण बागुल यांच्या हस्ते लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. 

स्नेह फाउंडेशन गेल्या १० वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, कुपोषण या प्रमुख मुद्द्यावर पिंपरी चिंचवड या भागात कार्य करत असते. संस्थेचे कार्यकारी अधिकारी सौ. श्रद्धा देव तसेच प्रकल्प व्यवस्थापक श्री. रवींद्र अंबोरे यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. वाघोली व केसनंद परिसरातील गरीब व गरजू नागरिकांचे नाव नोंदणी करण्यात आली. उदयकाळ फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांचे नाव घेऊन नागरीकांना वाघोली येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये सदरील लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. वाघोली व केसनंद येथील नागरिकांची उपस्थिती होती. उदयकाळ फाउंडेशनचे प्रकल्प समन्वय सौ. मनिषा साळी व सेक्रेटरी मयुर बागुल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. 

वाघोली व केसनंद परिसरातील नागरिकांनी मोफत लसीकरण केल्याबद्दल आभार मानले. - ९०९६२१०६६९

Post a Comment

Previous Post Next Post