पुण्यातील सर्व महिला सुनील कांबळे यांच्या घराबाहेर त्यांना शिव्यांची माळ घातल्या शिवाय राहणार नाही.... मनसे नेत्या रुपली ठोंबरे पाटील




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 


 पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ समोर आला. त्यानंतर इतर पक्षातील महिला नेत्यांनी आमदार सुनील कांबळे यांच्या हल्लाबोल केला आहे.भाजप  नगरसेवक आणि आमदार सुनील काबंळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पुण्यातील सर्व महिला सुनील कांबळे यांच्या घराबाहेर त्यांना शिव्यांची माळ घातल्या शिवाय राहणार नाही,' असा इशारा मनसे नेत्या रुपली ठोंबरे पाटील यांनी दिला. तसेच, यात राजकारण आणायची गरज नाही, सुधरा रे सुधरा काय भाषा आहे तुमची, लायकी नाही तुमची लोकप्रतिनिधी व्हायची.

पुणे शहरात, विद्येच्या माहेरघरात जे संस्कृतीचा नेहमी टेंभा मिरवतात, अशा भाजपचे नगरसेवक आणि आमदार सुनील कांबळे यांनी महापालिका कर्मचाऱ्याला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. बील काढण्यासाठी फक्त संबंधित महिला कर्मचाऱ्याला ही शिवीगाळ करण्यात आली.कुठे चालाली आहे ही प्रवृत्ती, हे लोकप्रतिनिधी पाहणार आहेत की नाही, याबाबत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ आणि महापौर मुरलीधर मोहोळ काय कारवाई करणार असा सवाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ समोर आला. त्यानंतर त्यांच्या विरोधात विरोधात इतर पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कांबळे यांच्या टिका केल्यानंतर आता मनसे नेत्या रुपाली ठोंबरे -पाटील यांनीही आक्रमक भुमिका घेतली आहे.

'एकीकडे महिला सुरक्षिततेचा, सक्षमतेचा नारा देताय, आंदोलने करताय, पण दूसरीकडे हेच लोक प्रतिनिधी जर महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत असतील तर अशा लोक प्रतिनीधींवर काय कारवाई करणार हे तुम्ही आम्हाला सांगितल पाहिजे. अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ आम्ही ऐकला. दुसऱ्याच्या आईला इतकं घाण बोलत असताना तो आमदार, आपल्याही घरात आई, बहिण, पत्नी आहेत हे विसरला का, असा संतप्त सवाल रुपाली ठोंबरे - पाटील यांनी विचारला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post