महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार महादेव बाबर यांनी हातामध्ये पोस्टर घेऊन केले अनोखे आंदोलन .



प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनीधी : 

पुणे :  शहरातील कोंढवा परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असताना सुद्धा हे खड्डे बुजवले जात नाहीत. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः  बारा वाजले आहेत , रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने  येणाऱ्या जाणाऱ्यांना  तारेवरची कसरत करावी लागत आहे,  अपघाताला सामोरं जावं लागत आहे.त्याच बरोबर या परिसरात कचरा मोठ्या प्रमाणावर जमा झालेला आहे. हा कचरा उचलला जात नाही तो कचरा उचलावा यासाठी महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार महादेव बाबर यांनी हातामध्ये पोस्टर घेऊन अनोखे आंदोलन केलं .'आय लव यु कचरा, आय लव यु खड्डा' म्हणत शिवसेनेनं हे आंदोलन करून महानगरपालिकेचे लक्ष वेधलं आहे.

महानगरपालिकेकडे वारंवार मागणी करूनही महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे असा आरोप करत शिवसेनेने कोंढव्यात आंदोलन केले. दरम्यान यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या परिसरात मागील काही दिवसांपासून पाण्याचा तुटवडा आहे त्यामुळे 'मुबलक पाणी केव्हा मिळणार?' अशी पोस्टर हातात घेत महानगरपालिका व नगरसेवकांचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रसाद बाबर, तानाजी लोणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post