होर्डिंग लावणाऱ्या ' त्या' अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 पुणे : कात्रज चौकाजवळ जुन्या रस्त्यावर कात्रजचा खून झाला  अशा आशयाचे विचित्र होर्डिंग उभारण्यात आले होते.त्यामुळे मंगळवारी दिवसभर याचीच चर्चा शहरात रंगली होती. तर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे होर्डिंग कोणी लावले हे मात्र स्पष्ट झाले नसले तरी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हे होर्डिंग लावणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हनुमंत तुकाराम लोणकर  रा.कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

कात्रज चौकाजवळ जुन्या रस्त्यावर हे होर्डिंग उभारण्यात आले असून त्यावर रक्ताने माखलेला चाकूचे चित्र असलेला आणि त्यावर कात्रजचा खुन झाला असा विचित्र मजकुर लिहिला होता. त्यामुळे पुण्यात या होर्डिंगचीच चर्चा दिवसभर सुरु होती. हे होर्डिंग कोणी लावले हे समोर आले नसले तरी उलट सुलट चर्चेला ऊत आला होता.होर्डिंग लावण्याची परवानगीही घेतली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरणही पसरले होते.भारती विद्यापीठ पोलिसांकडुनही या प्रकरणचा तपास सुरु होता.अखेर महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाच्या वतीने फिर्याद देण्यात आली.त्यानुसार अनोळखी व्यक्ति विरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याच्या कायद्यानुसार गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post