पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी गांधी भवन मध्ये संवाद ; महाराष्ट्र गांधी स्मारक निधी , युक्रांदचा पुढाकार भारत सरकारने वर्क परमिट, शिष्यवृत्ती द्यावी : पुण्यातील अफगाण विद्यार्थ्यांच्या अपेक्षा



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे :अफगाणिस्तानच्या अस्वस्थ  परीस्थितीमुळे  तेथील सर्वसामान्य माणसाचे आणि पुण्यात शिकणा-या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून गेले आहे . या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांशी  संवाद साधण्यासाठी  महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाने संवाद कार्यक्रम आयोजित  केला होता. हा संवाद कार्यक्रम गुरुवारी दुपारी २ वाजता गांधी भवन (कोथरूड) येथे पन्नास अफगाणी विद्यार्थ्याच्या उपस्थितीत पार पडला .

या कार्यक्रमाचे संयोजक आणि युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर यांनी प्रास्ताविक केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

 महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युक्रांदचे  अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी , ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले,युक्रांद चे राज्य कार्यवाह संदीप बर्वे ,शहराध्यक्ष सचिन पांडुळे, रोहन गायकवाड इत्यादी उपस्थित होते. डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, 'धर्म ही मानवाने तयार केलेली गोष्ट आहे. मानवता हाच खरा धर्म आहे.एकमेकांच्या वेदना समजून घेणे हेच गांधीजींनी आपल्याला शिकवले आहे. अहिंसा, बंधुभाव हेच तत्व घेऊन पुढे गेले पाहिजे. या सर्व अडचणीतून पुढे जाऊन या विद्यार्थ्यांनी नवा हिंसा मुक्त, भेदभाव मुक्त अफगाणिस्तान घडवला पाहिजे.

निरंजन टकले म्हणाले, ' अफगाण विद्यार्थ्यांना मदत करण्याचे उत्तरदायित्व भारत सरकारचे आहे. अडचणीत सापडलेल्या इतर देशातील नागरिकांना मदत करण्याची भारताची परंपरा आहे. मानवतेची परंपरा गांधीजींनी निर्माण केली, ती पुढे नेली पाहिजे. पुणेकर नागरिकांची जबाबदारी ते पार पाडतीलच. पण, वैयक्तिक पातळीवर मी दहा हजार रुपये मदतनिधीला देत आहे. शिक्षण पूर्ण करताना काम करुन पैसे कमाविण्याची परवानगी या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे.

जांबुवंत मनोहर म्हणाले, ' वेदना , हसू कोणत्याही भाषेच्या पलिकडे आहेत. म्हणून अफगाणी विद्यार्थ्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.गांधींजींच्या मानवतेचा विचार पुढे नेण्यासाठी या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.

शहाबुद्दीन हा विद्यार्थी म्हणाला, ' मानवता आणि सहिष्णुतेचा विचार  या कार्यक्रमातून पुढे जात आहे. ही चांगली गोष्ट आहे. भारत -अफगाणीस्तानचे स्नेहाचे संबंध जुने असून ते वृद्धींगत व्हावेत, अशी आमची इच्छा आहे.

दिलावर या विद्यार्थ्यांनेही दिलावर यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण, विकास या संदर्भात भारताने मदत केली आहे. आता आम्ही अडचणीतून पुढे जात आहोत.भारतात रोजगारसंधी , व्हिसा एक्सटेंशन, शिष्यवृत्ती  या आमच्या तातडीच्या गरजा आहेत.

अफगाणमध्ये उत्पन्नाचा मार्ग आता तरी खुंटला आहे.बऱ्याच विद्यार्थाचा पासपोर्ट, व्हीसा अफगाण मधील भारतीय वकिलातीत अडकले आहेत. पुण्यात घरभाडे भरण्यासारखे प्रश्न आहेत. आम्हाला वर्क परमिट मिळाले पाहिजे.

मंझूर हा विद्यार्थी म्हणाला, ' सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न समान आहेत. अफगाणमधील नातेवाईकांचा संपर्क तुटला आहे.तेथील व्यवसाय ठप्प आहेत.पण, रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे.आमच्या पुढील  शैक्षणिक शुल्क भरण्याचाही प्रश्न उभा आहे. भारतीय सरकारने आम्हाला शिष्यवृत्ती द्यावी.ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे,आदित्य आरेकर, संजय सोनटक्के, गोरख भालेकर, ललीत मुथा सभागृहात उपस्थित होते.

                                                                                                                                               

Post a Comment

Previous Post Next Post