पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाची तरतूद इतरत्र वळविली



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी - चिंचवड  महापालिकेची निवडणूक अवघ्या 6 महिन्यांवर येऊन ठेपली आहे . त्यामुळे ठराविक प्रभागांतील कामे मार्गी लावण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून इतर कामांच्या निधी पळविण्याचे सत्र कायम आहे . नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचा निधी इतरत्र वळविण्यास ऐनवेळी मंजुरी देण्यात आली आहे .

महापालिका निवडणुका सहा महिन्यांवर आल्याने सत्ताधारी भाजपकडून विविध कारणांने निधी वर्ग करण्याचा सपाटा सुरू आहे . महासभा व स्थायी समितीमध्ये सातत्याने सन 2021-22 च्या अंदाजपत्रकातील विविध कामांसाठी केलेल्या तरतुदीचे वर्गीकरण करून तो निधी इतर कामांसाठी वळविला जात आहे . आमच्या प्रभागांतील कामांसाठी तरतूद केलेली निधी सत्ताधारी आपल्या प्रभागांतील कामांसाठी पळवून नेत आहेत , अशी टीका विरोधकांनी वारंवार केली आहे . तरीही , निधी वर्गीकरणाचे सत्र सुरूच आहे .

नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत अंदाजपत्रकातील निधी वर्गीकरणास आयत्या वेळी मंजुरी देण्यात आली . पालिकेच्या वतीने पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधला जाणार आहे . त्यासाठी आवश्यक जागा संरक्षण विभागाने पालिकेस देण्यास परवानगी दिली आहे . तसेच , रेल्वे विभागाने मंजुरी दिली आहे . त्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 55 कोटी आहे . सन 2021-22 च्या अंदाजपत्रकात 4 कोटी 12 लाख 81 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे . त्यातील 3 कोटी निधीची घट करण्यात आली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post