क्राईम न्यूज : फॉरेक्‍स ट्रेडींगमध्ये गुंतवणूकिच्या नावाने फसवणूक ,तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड़ : करारानुसार ट्रेड विकत न घेता 86 लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना 25 नोव्हेंबर 2019 ते एप्रिल 2021 या कालावधीत ‘ब्लू रिच’, हिंजवडी येथे घडली.

नंदकुमार पिराजीराव मुतकेकर (वय 48, रा. फेज वन, हिंजवडी) यांनी सोमवारी (दि. 13) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमनराज, हर्ष शर्मा आणि रूषभ जैन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फॉरेक्‍स ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास कशा प्रकारे फायदा होतो, असे खोटे सांगून फिर्यादी नंदकुमार यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर करारनामा करीत त्यांचे ट्रेडिंग अकाऊंट तयार केले. मात्र, ठरल्याप्रमाणे ट्रेड विकत न घेता वेगळेच ट्रेड विकत घेत फिर्यादी नंदकुमार यांची 86 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस आणखी तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post