सायबर क्राईमद्वारे पैशाची फसवणूक सारखे प्रकार वाढले. या बाबत राज्याच्या गृहविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात...आमदार महेश लांडगे यांची मागणी.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख:

पिंपरी चिंचवड़ :  महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये देशातील काना कोपऱ्यांमधून नोकरी- व्यावसायाकरिता वास्तव्य करतात. कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात अन्य गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेले दिसत असले तरी सायबर क्राईमद्वारे ऑनलाईन पैशाची फसवणूक सारखे प्रकार वाढले आहेत. याबाबत राज्याच्या गृहविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन दिले.

माहिती तंत्रज्ञानाचा दुरूपयोग करून नागरिकांच्या कमाईवर ऑनलाईन डल्ला मारण्याचे प्रकार महाराष्ट्रात सध्या वाढत आहेत. सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमध्ये देशात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे, ही बाब चिंताजनक आहे. याबाबत गृह मंत्रालयाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, २०२० मध्ये राज्यात तब्बल ५ हजार ४९६ गुन्हे दाखल झाल्याची माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आली आहे. उत्तर प्रदेशामध्ये सायबर क्राईमचे प्रमाण सर्वाधिक असून, गेल्यावर्षी राज्यात ११ हजार ९७ गुन्हे दाखल झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post