दिघी, भोसरी ,सांगवीतून तीन अल्पवयीन मुले बेपत्ता; शहरात भीतीचे वातावरण

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी,चिंचवड़ : दिघी,भोसरी, आणि सांगवी परिसरातून तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शनिवारी दि.११ रोजी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत,

  दिघी पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेची 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. हा प्रकार शनिवारी दि.११रोजी दुपारी घडला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचा 17 वर्षीय मुलगा सहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाला. मुलाच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन कशाचे तरी अमिष दाखवून त्याला पळवून नेल्याचा संशय फिर्यादी यांचा आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत. 

सांगवी पोलीस ठाण्यात 33 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या 16 वर्षीय मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. हा प्रकार शुक्रवारी दि.१० रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सांगवी परिसरात घडला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post