लेटेस्ट न्युज : कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकास कामांना एमएमआरडीए कडून 28 कोटी 33 लाखाचा निधी..

कर्जत शहर होणार चकचकीत...एमएमआरडीए चे प्रशासकीय मान्यता

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 पनवेल सुनील पाटील

कर्जत नगरपरिषद क वर्गाची नगरपरिषद असल्याने नगर परिषद क्षेत्रात विकास कामांना निधी कमी पडत असतो, सदर विकास कामांना एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची वेळोवेळी यांची भेट घेवून कर्जत नगरपरिषदेचे क्षेत्रातील प्रस्ताव सादर केले होते, या प्रस्तावास नगर विकास विभागाच्या कडून कर्जत नगरपरिषद क्षेत्रात 28 कोटी 33 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.









कर्जत नगरपरिषदेच्या अध्यक्षा सुवर्णा जोशी नगरपरिषदेच्यावतीने मुंबई महानगर विकास प्राधिकरण महानगर आयुक्त यांना दि.19 सप्टेंबर 2019 रोजी पत्र देवून नगरपरिषद हद्दीतील विकास कामे बाह्य रस्ते विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित करून सदर कामांना कर्जत नगरपरिषदेस निधी उपलब्ध करून मिळावा अशी मागणी केली होती. त्यानंतर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, युवा सेना पदाधिकारी मयूर जोशी, केतन जोशी त्यांना कर्जत नगरपरिषदेमधील विकास कामांना निधी मिळावा अशी विनंती खासदार व नामदार यांच्याकडे केली होती.

यांच्या पाठपुराव्याला यश आले असून खासदार श्रीरंग आप्पा बारणे तसेच नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या पाठपुराव्याला यश एमएमआरडीएच्या माध्यमातून 28 कोटी 34 लाखाचा भरीव निधी मंजूर झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एमएमआरडीए क्षेत्रातील रस्ते विकास योजने अंतर्गत खालील कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

 कर्जत नगर परिषद हद्दीतील शिवम सोसायटी ते फायर स्टेशन कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे यासाठी 2 कोटी.


Post a Comment

Previous Post Next Post