महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता.......



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ए.सी.बी.) मे.न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे मे.न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर मे. न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे.

 दरम्यान याआधीच ए.सी.बी.ने याच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आरोपीं विरोधात कुठलेही सबळ पुरावे ए.सी.बी.कडे उपलब्ध नाहीत असे मे.न्यायालयाने म्हटले आहे. या आधी महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात पुरावे असल्याचा दावा करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ यांच्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीला विरोध केला होता.

 आपल्याविरोधात ठोस पुरावे नसल्याचा दावा करत भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर यांनी प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला होता. मात्र भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यासाठी पैसे मिळाले होते याचा पुरावा असल्याचा दावा ए.सी.बी.तर्फे करण्यात आला होता.

 या प्रकरणातील मूळ तक्रारदार अंजली दमानिया यांनीही मे.विशेष न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणी आपली बाजू ऐकण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करण्याची सूचना मे.न्यायालयाने त्यांना केली.

Post a Comment

Previous Post Next Post