पिंपरीतही विविध संघटनांनी भारत बंदला पाठींबा दिला



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जन आक्रोश आंदोलन सुरू आहे.सरकारच्या कृषी कायद्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता देऊन आज बरोबर एक वर्ष झाले,तेव्हा पासून आज पर्येंत या कायद्याचे विरोध होताना दिसत आहे,   या कायद्याविरोधात मागील वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या  भारत बंदला  पिंपरीतही विविध संघटनांनी बंदला पाठींबा दिला . नवीन तीन कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याचा दावा करत मागील एक वर्षांपासून शेतकरी त्या कायद्या विरोधात आंदोलन करत आहेत,

 कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष  कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, काशिनाथ नखाते, संदीपन झोंबडे, दिलीप पवार, निरज कडू, संदेश नवले, हमीद इनामदार, पांडूरंग गाडेकर आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post