गणेशोत्सव २०२१ अंतर्गत श्रीगणेश मूर्ती विसर्जनाच्या पार्श्व भूमीवर नगरपरिषद यंत्रणा सुसज्ज



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

   इचलकरंजी शहरामध्ये कोव्हिड - १९च्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरुन देणेत येत असलेल्या आदेशांचे पालन करून त्याच बरोबर मा. जिल्हाधिकारी यांच्या  सुचनेनुसार  यावर्षीचा गणेशोत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने मंगळवार दि.१४ सप्टेंबर रोजी शहरातील घरगुती श्रीगणेश मुर्ती विसर्जन

होणार आहे. सदर नियोजना करिता    नगरपरिषद प्रशासनाची महत्वपुर्ण बैठक नाट्यगृहात नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी आणि मुख्य अधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

  सदर बैठकीत सर्व अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक त्या सुचना करणेत येवुन विसर्जन सोहळ्यासाठी नगरपरिषद प्रशासकीय यंत्रणा सज्ज करणेत आलेली आहे. 

        यावर्षी  श्रीगणेश मूर्ती विसर्जन शहापूर खणीसह शहरातील विविध ३० ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने ठेवणेत येणाऱ्या कृत्रिम विसर्जन कुंडात करणेचे

नियोजन करणेत आलेले आहे. शहापुर खण येथील विसर्जन स्थळी तसेच गणेश मूर्ती कृत्रिम विसर्जन कुंड तसेच निर्माल्य कुंड असलेल्या सर्व ठिकाणी दोन शिप्टमध्ये जवळपास ४०० पूर्णवेळ अधिकारी- कर्मचारी तसेच  स्वयंसेवक यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत.

यामध्ये आरोग्य विभाग , बांधकाम विभाग, वाहन विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, आपत्कालीन विभाग आणि अतिक्रमण विभागाचा समावेश आहे. त्याचबरोबर १५ आयशर टेंपो,६ डंपर, २ यांत्रिक बोटी, १ रुग्ण वाहिका,१ अग्निशमन वाहन अशी यंत्रणा सज्ज ठेवणेत येणार आहे. 

  

 शहरातील कृत्रिम गणेश मुर्ती विसर्जन विसर्जन कुंडाची ठिकाणे खालील प्रमाणे.


१) गाव चावडी जवळ,   शहापूर 


२) शहापूर चौक


३) एस. टी. आगार  चौक.


४)  दत्तनगर चौक (दत्त मंदिर)


५) गणेश नगर गल्ली नं.

     ४ कॉर्नर


६) विकास नगर चौक.


७) मणेरे हायस्कूल चौक


८) स्टेशन रोड डेक्कन चौक.


९) लिंबू चौक,

   

१०) सरस्वती हायस्कूल 


११) छ. शाहू पुतळा


१२) थोरात चौक 


१३) राधाकृष्ण चित्र मंदिर चौक

 

१४) विक्रमनगर 

  

१५) बिग बझार चौक


१६) सांगली नाका


१७)  महासत्ता चौक.


१८)  म. गांधी पुतळा 


१९) के.एल.मलाबादे चौक    


२०) छ.शिवाजी पुतळा


२१)  संभाजी चौक


२२) बंडगर माळ  


२३) मॉडर्न हायस्कूल   जवळ

   

२४) शाहु हायस्कूल रोड 


२५) हत्ती चौक 

  

२६) व्यंकोबा मैदान चौक.


२७) वैरण   बाजार


२८)  षटकोन चोक  


२९)  मरगुबाई मंदिर.


३०)  राणाप्रताप चौक

      तरी इचलकरंजी शहरातील नागरिकांनी गणेश मूर्ती विसर्जना करिता कोव्हिड -१९ च्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करुन  शहापूर खण येथे किंवा आपल्या घराजवळच्या कृत्रिम विसर्जन कुंडात गणेश मूर्ती विसर्जित करून आपल्या शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य समिती सभापती संजय केंगार आणि  मुख्य अधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांनी केले आहे.


      

Post a Comment

Previous Post Next Post