दत्तवाड येथे राष्ट्रवादीतर्फे सोमय्या यांच्या प्रतिमेस ' जोडे मारो ' आंदोलन

 

दत्तवाड : प्रतिनिधी- 

   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ दत्तवाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील गांधी चौकात किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गांधी चौक परिसरात एकत्र येऊन त्यांनी किरीट सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणादिल्या व मुश्रीफ यांच्या विजयाचा घोषणा देत सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करून  पोस्टरचे दहन केले . 

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्ष नूर काले यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले . यावेळी धन्यकुमार सिदनाळे , रफिक मुल्ला , दादासो कांबळे , राजू वडर , चंद्रकांत बिरंणगे , चंद्रकांत कांबळे , लाला मांजरेकर , सोहेल गवंडी , नटराज माळगे , राखी कोळी , अनिता कडाके , काशीबाई केंगारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post