एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' मध्ये मालेगाव बाँम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा यांचे वेबिनार मध्ये मार्गदर्शन.

 प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

एमआयटी नाव विश्वशांती आणी देशविघातक कृती करणार्‍यालाच सहकार्य करतेय काय? हे या प्रसंगातुन दिसुन येतेय. विश्वनाथ कराड यांच्या मेहनतीने हे खाजगी एमआयटी विदयापीठ उभे राहिले. गत काही वर्षांपासून वेगवेगळया फतव्याने हे विद्यापीठ नेहमीच चर्चेत राहिले आहे.

या विद्यापीठांतर्गत विविध कोर्सस चालतात. त्यातील हा SOG नावाचा कोर्स विद्यार्थ्यांना राजकीय नेतृत्व घडवण्याचे काम करतो. यातून किती नेतृत्व तयार होतात. हा संशोधनाचा विषय.पण या अभ्यासक्रमात सध्या बोटावर मोजण्याएव्हढेच विद्यार्थी आहेत. सुरवातीपासुन या कोर्ससला उतरती कळा लागली होती,कारण याची अवाढव्य फी आणी याबदल बरेच समज व गैरसमज होते.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि संस्कृतिक क्षेञातील देशभरातील दिग्गज मान्यवर याठिकाणी मार्गदर्शनासाठी येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून यातंर्गत भारतीय छाञ संसद हा उपक्रम मोठा गाजावाजा करत चालतो. या उपक्रमांतर्गत देशाच्या विविध कानाकोपार्‍यातील विद्यार्थी या माध्यमातून सुरवातीस जोडले गेले होते. पण आता या उपक्रमाची ही दुर्दशा होताना दिसत आहे.असो यातुन सांगण्याचा हेतू एकच कार्यक्रमाला कोणाला आणावे हा एमआयटी संस्थेचा व्यक्तीगत प्रश्न आहे. परंतु साध्वी प्रज्ञा यांच्यासारख्या बॉम्बस्फोटाचे आरोप असणाऱ्या व्यक्ती 'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असतील तर विचार करण्याजोगी बाब आहे.

साध्वी या 2008 मधील मालेगाव बाँम्बस्फोटातील आरोपी असुन त्यांच्यावर मोक्का ही लावण्यात आला होता. धर्मांध आणि विखारी वक्तव्य करणार्‍या, सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या, शहिद हेमंत करकरे यांचा अपमान करणार्‍या  अशा क्रुर लोकांना मार्गदर्शन करायला लावून एमआयटीला काय साध्य करायचं आहे?असे देशविघातक काम करणार्‍या साध्वीनी विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करावे? आणि विद्यार्थ्यांनीदेखील त्यांच्याकडून काय शिकावे, याचे उत्तर राहुल कराड व विश्वनाथ कराड यांनी देणे अपेक्षित आहे.

एमआयटीला सदर व्यक्तीची पार्श्वभुमी माहीत असुनही यांना मार्गदर्शनास बोलावून आपला अजेंडा राबवण्याचं काम करायच आहे का.? कुठल्याही शैक्षणिक संस्था मुळातच संवैधानिक विचारांची केंद्र बनने अपेक्षित आहे. पण येथे स्वायंतेच्या नावी स्वैराचारच. भलतेच घडते अन का घडवले जाते हा प्रश्न निर्माण होतो.म्हणतात न म्हतारी मेल्याचं दुख नाही,   पण काळ सोकावतो. असा प्रकार.


कुलदीप आंबेकर 9689794776

अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँड.

Post a Comment

Previous Post Next Post