निवारा छावणीवरील जनावरांसाठी शरद कारखान्याकडून चारा पुरवठा


शिरोळ-


शिरोळ तालुक्यातील पूर बाधित गावांमधील जनावरांना गावांना पाण्याने वेढा दिल्यामुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले होते अशा स्थलांतरित केलेल्या निवारा छावणी वरील जनावरांसाठी गुरुवारी शरद साखर कारखान्याकडून चारा पुरवठा करण्यात आला अशी माहिती शरद सहकारी साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भुपाल आवटी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे,
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे शिरोळ तहसीलदार कार्यालयाकडून शरद  साखर कारखान्यास  बाधित गावातील निवारा छावणीवर असणाऱ्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा असे आदेश दिले होते, शरद सहकारी साखर कारखान्याने प्रशासनाने 



दिलेल्या आदेशाप्रमाणे गुरुवारी शिरोळ, शरद कृषी महाविद्याल जैनापुर येथील निवारा छावणी, दानोळी, शिक्षकी व हेरवाड या गावांमधील निवारा छावणीवर एकत्रित असलेल्या किंवा सुरक्षितेसाठी एकत्रित बांधलेल्या जनावरांसाठी चारा पुरवण्यात आला मुख्य शेती अधिकारी दीपक पाटील व अॅग्री ओव्हरसियर महावीर ऐनापुरे, प्रकाश चौगुले, विक्रम पिष्टे यांच्यासह पूरबाधीत नागरिक व त्या ठिकाणी असलेल्या जनावरांचे मालक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post