या संकटातील नागरिक व व्यापाऱ्यांना मदत करण्यात राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही...उपमुख्यमंत्री अजित पवार.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

महापुराचे संकट धरणातील पाण्यामुळे अथवा मानवनिर्मित नसून, ढगफुटीसारख्या अतिवृष्टीमुळे ओढवले आहे. मात्र, या संकटातील नागरिक व व्यापाऱ्यांना  मदत करण्यात राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही. मात्र, केंद्रानेही आपली भूमिका पार पाडावी. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत मदतीची घोषणा केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांच्या या दौऱयात जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित होते.सांगली जिह्यातील भिलवडी व सांगली शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्र्यांच्या पाहणी दौऱयात नोडल अधिकारी

अशा संकटाच्या काळात राज्यातील, केंदातील अनेक मंत्री पाहणी दौरे करतात. या दौऱयात अमुक अधिकारी नाही म्हणून खदखद होते. वास्तविक अशा आपत्ती काळात जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱयांनी जिह्यात, कार्यालयात थांबून काम केले तर ते प्रभावी ठरते. त्यामुळे आपत्ती काळात केंद्र अथवा राज्याच्या मंत्र्यांच्या दौऱयात स्वतंत्र नोडल अधिकारी उपस्थित राहतील, असा निर्णय सरकारने घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post