अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची आमदार नितीन देशमुख यांनी केली पाहणी; सर्व्हे करण्याचे प्रशासनाला दिले आदेश.




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 बाळापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये  बुधवारी रात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले असून घरे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील गायगाव, निमकर्द, खंडाळा, हातरुण, कवठा, अमानतपुर ताकोडा,मांजरी,कंचनपूर सह तालुक्यात अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे तसेच नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक शेत,घर व पशूंचे जीवितहानी होऊन प्रचंड नुकसान झाले आहे.सर्व भागाची  पाहणी करून प्रशासनाला नुकसानग्रस्त झालेल्या भागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश  आमदार नितीन देशमुख यांनी दिले उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या नुकसंग्रस्तांच्या पाठीशी सरकार,शासन,प्रशासन खंबीरपणे सोबत असून लवकरात लवकर मदत पोहचिवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मा आमदार नितीनजी देशमुख यांनी सांगितले आज काही ठराविक ठिकाणी पाहणी दौरा असल्यामुळे ज्या ठिकाणी पुराचे पाणी गेल्याने नुकसान झाले अश्या सर्व शेताचे व घराचे पंचनामे करा जेणेकरून एकही नुकसानग्रस्त शेतकरी व घरमालक मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेण्याचे मा आमदार यांनी तलाठी व कृषी सहय्यकांना सांगितले .

यावेळी सोबत उपविभागीय अधिकारी श्री पुरी साहेब तहसीलदार श्री मुकुंदे साहेब तालुका कृषिअधिकारी श्री माने साहेब व भेटी दिलेल्या ठिकाणचे तलाठी,कृषी सहाय्यक,सरपंच शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होत

Post a Comment

Previous Post Next Post