राज्य सरकारने पुण्यासह काही जिल्ह्यात 50 टक्‍के उपस्थितीसह सर्व खासगी क्‍लासेस सुरू करण्याची मुभा दिली



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 पुणे - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पॉझिटिव्हीटी दरचे निकष लक्षात घेता राज्य सरकारने पुण्यासह काही जिल्ह्यात 50 टक्‍के उपस्थितीसह सर्व खासगी क्‍लासेस सुरू करण्याची मुभा दिली आहे. मात्र सरसकट राज्यभरात खासगी क्‍लासेस सुरू न झाल्याने खासगी क्‍लासेसवाल्यांची आर्थिक परवड होत आहे. त्यामुळे आरोग्याचे सर्व नियम पाळून 21 जूनपासून महाराष्ट्रातील सर्व खासगी क्‍लासेस सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य खासगी क्‍लासेस कृती समितीने घेतला आहे.

राज्यातील विविध भागातील सहा संघटना एकत्रित येत 'महाराष्ट्र कोचिंग क्‍लासेस कृती समिती'ची स्थापन करण्यात आली. या समितीने आज पुण्यात पत्रकार परिषद घेत खासगी क्‍लासेस बंद असल्याने क्‍लासेससमोर निर्माण झालेले अनेक अडचणी मांडल्या

.यावेळी समितीचे विजय पवार, सतिश देशमुख, दिलीप मेहेंदळे, रजनीकांत बोंद्रे, संतोष वासकरसह आदी उपस्थित होते.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेली 14 महिने राज्यातील जवळपास 1 लाख खासगी कोचिंग क्‍लासेस संपूर्णत: बंद आहेत. त्यातील पुण्यातील 17 हजार क्‍लासेसचा समावेश आहे. त्यामुळे क्‍लासचालक, तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. सुमारे 40 टक्‍के शिक्षकांनी क्‍लासेसचे क्षेत्र सोडून दिले आहेत. तसेच, क्‍लासेसचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, दैनंदिन खर्च, लाईट व पाणी बिल यांचे आर्थिक ओझे यामुळे पुरता खचला आहे, याकडे समितीच्या सदस्यांनी लक्ष वेधले. या सर्व स्थितीचा विचार करून येत्या 21 जूनपासून महाराष्ट्रात खासगी क्‍लासेस सुरू करीत आहोत. त्यास शासनाचे सहकार्य करावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.

क्‍लासेस कृती समितीच्या मागण्या
1. खासगी क्‍लासेसंना शासनाने पॅकेज जाहीर करावी,
2. सर्व कर माफ करण्याची मागणी.
3.क्‍लासेससाठी जीएसटीची मर्यादा कमी करावी.
4. परीक्षा मंडळात क्‍लासेस प्रतिनिधींचा समावेश करावा.
5. क्‍लासेससाठी ''चेंबर ऑफ क्‍लासेस सुरू करावी.
6. क्‍लासेस चालकांच्या मृत्यूनंर कुटुंबीयांना मदत मिळावी.

Post a Comment

Previous Post Next Post