अदर पूनावाला यांची सुरक्षेची याचिका निकाली.




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सुरक्षेची मागणी केली तर ते भारतात परतताच त्यांना योग्य ती सुरक्षा पुरवली जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने यापूर्वीच दिली आहे, असे राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारी मुंबई हायकोर्टात सांगण्यात आले.

खंडपीठाने राज्य सरकारने दिलेली ही ग्वाही नोंदीवर घेऊन याप्रकरणातील अ‍ॅड. दत्ता माने यांची याचिका निकाली काढली आहे. कोविड वरील लसच्या पुरवठ्यावरून अदर पूनावाला यांना धमकावण्यात आले होते. त्याकडे लक्ष वेधत पूनावाला यांना केंद्र आणि राज्य सरकारने झेड प्लस सुरक्षा पुरवावी अशी मागणी करणारी याचिका अ‍ॅड. दत्ता माने यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.या याचिकेवर आज न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

Post a Comment

Previous Post Next Post