मुंबईत जम्बो कोविड सेंटर ओस पडू लागली



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आल्याने जम्बो कोविड सेंटर ओस पडू लागली आहेत. सहापैकी वरळी 'एनएससीआय' डोम आणि गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण असून दहिसर, बीकेसी, मुलुंड जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. तर भायखळ्याचे रिचर्डसन क्रुडास सेंटरमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. फक्त अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात 50 टक्के कोरोना रुग्ण असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

जम्बो कोविड सेंटरची सद्यस्थिती

  • गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये एकूण 2221 बेड आहेत. मात्र या ठिकाणी सद्यस्थितीत केवळ 190 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • वरळी 'एनएससीआय' डोम जम्बो कोविड सेंटरमध्ये 550 बेड असून या ठिकाणी केवळ 79 रुग्ण उपचार घेत आहेत.
  • अंधेरी सेव्हन हिल्स रुणालयात 1750 बेड असून या ठिकाणी केवळ 850 म्हणजे सुमारे केवळ 50 टक्केच रुग्ण उपचार घेत आहेत.

तरीही संभाव्य तिसऱया लाटेसाठी 5500 बेडचे नियोजन

  • कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी तज्ञांनी तिसरी तीव्र लाट येण्याचा धोका असल्यामुळे पालिकेने चार नवे जम्बो कोविड सेंटरचे नियोजन केले आहे. यामध्ये मालाड, रेसकोर्स महालक्ष्मी, कांजूरमार्ग आणि भायखळा या ठिकाणी हे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे 5500 बेड उपलब्ध होतील.
  • या बेडमध्ये 70 ऑक्सिजन बेड तर 10 टक्के आयसीयू बेड सुरू करण्यात येतील, असे काकाणी यांनी सांगितले. तिसऱया लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा इशारा देण्यात आल्यामुळे नव्या जम्बो कोविड सेंटरमध्ये पेडियाट्रिक वॉर्ड असेल. ज्या ठिकाणी गरजेनुसार पालकांनाही थांबण्याची सुविधा असेल.

Post a Comment

Previous Post Next Post