सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठांनी मार्गदर्शकाची भूमिका बजवावी आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर








मजरेवाडी येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभा प्रसंगी काढले उदगार


मजरेवाडी-

सहकार, शासकीय असो अथवा खाजगी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर या ज्येष्ठ मंडळींनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यावा, सहकार, समाजकारण आणि राजकारण इथेही सक्रिय राहावे, त्याच बरोबर आमच्या सारख्या नव्या पिढीला मार्गदर्शन करावे आणि सेवानिवृत्तीनंतर च्या या काळात कुशल मार्गदर्शकाची समर्थ भूमिका पार पाडावी असे उदगार युवा नेते आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले, मजरेवाडी येथील हनुमान सहकारी पतसंस्था, दत्त विकास सेवा सोसायटी व इतर सहकारी संस्थांच्या वतीने सहकार व शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आदित्य पाटील-यड्रावकर यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते,

कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती भालचंद्र कागले प्रमुख उपस्थित होते, सेवानिवृत्तीनिमित्त महेश बिरनाळे, दिनकर नरूटे, रावसाहेब मडिवाळ, दिलीप पट्टेकरी, भुपाल बुबनाळे, आप्पासो नरुटे या मान्यवरांचा सत्कार आदित्य पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी सेवा काळातील आलेले अनुभव निवृत्त कर्मचाऱ्यांनी यावेळी आपल्या मनोगतामध्ये बोलताना व्यक्त केले, यावेळी भालचंद्र खुरपे, बापुसो परीट, यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post