ससून रुग्णालयाच्या कोविड इमारतीतून रेडमॅक कंपनीच्या रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल



पुणे :  ससून रुग्णालयाच्या कोविड इमारतीतून रेडमॅक कंपनीच्या रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ससून रुग्णालयातील परिसेविकेने फिर्याद दिली आहे. ही घटना 1 ते 3 मे कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परिसेविका ससून रुग्णालयातील कोविड इमारतीत कर्तव्यावर आहे. त्यांच्यासोबत असलेल्या औषध मागविणाऱ्या अधिपरिचारीका यांनी 1 मे ला रुग्णासाठी इंजेक्शन मागविले होते. त्यानंतर इंजेक्शन मिळाल्यानंतर त्यांनी खाली व्हायलमध्ये आणून ठेवले. मात्र, काही तासानंतर इंजेक्शन मिळून न आल्याने त्यांनी शोधाशोध केली.परंतू ते मिळून आले नाही. त्यानुसार त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिश ठाकूर करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post