काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन .



पुणे | काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन झाले. त्यांना प्रकृती पुन्हा एकदा गंभीर झाल्याने शनिवारी पहाटे पासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पुण्यातच जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक २४ तास त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते.

काँग्रेसचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल येथे कोरोनावर उपचार घेत होते. 29 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कोरोनातून बरे झाले होते मात्र त्यांना दुसऱ्या एका विषाणूने घेरले होते.गरज भासल्यास इक्मो मशीन देखील उपलब्ध करण्यात आली होती. मुंबईल येथील डॉ. राहुल पंडित, डॉ. शशांक जोशी यांच्या पथकाने पुणे येथे येऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती.त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान, मागील आठवड्यात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यामुळे चोवीस तासांपैकी काही तासच त्यांना व्हेंटिलेंटरवर ठेवले जात होते. त्यानंतर शुक्रवारी हिंगोलीच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी डॉ. राहुल पंडित यांना सोबत घेऊन पुणे गाठलेे होते. त्यानंतर डॉ. पंडित यांनी खासदार अ‍ॅड. सातवांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post