मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रविवारी दुपारी बारा वाजता राज्याच्या टास्क फोर्ससह अनेक तज्ञ डॉक्टरांशी संवाद साधणार



कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करताना सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री आज रविवारी दुपारी बारा वाजता राज्याच्या टास्क फोर्ससह अनेक तज्ञ डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत. फॅमिली डॉक्टरांनी 'माझा डॉक्टर' म्हणून कोरोना विरुद्धच्या लढय़ात उतरावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. याच्या पुढील टप्प्यात 16 मे रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मीडियावर एका विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनावर उपचार या विषयावर महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित हे बोलतील.

प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोरोनावर उपचार

या कार्यक्रमात डॉक्टर्सनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन कोरोना लढाईला अधिक बळ देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

कुठे व किती वाजता

हा कार्यक्रम OneMD च्या फेसबुक https://www.facebook.com/100441008205176/posts/304013491181259/ आणि यूटय़ूब चॅनेलवर https://youtu.be/7dH0X0FTCpc उद्या रविवारी दुपारी 12 वाजता पाहायला मिळेल.

Post a Comment

Previous Post Next Post