इचलकरंजी शहरात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे

 


इचलकरंजी शहरात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे.

 दुध व भाजीपाला विक्रीसाठी सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत घरपोच सेवा  सुरू राहणार आहे...औषध दुकानं, दवाखाने आणि त्याच्याशी संबंधित अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...मॉर्निंग वॉकला व सायंकाळी व्यायामासाठी फिरणार्‍यांवर* स्वतंत्र पोलिस पथकाद्वारे लक्ष असणार आहे...  लॉकडाऊन कारवाईबाबत सोशल मिडीयावरून गैरसमज पसरवणार्‍यांवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल ...

 लॉक डाऊन कालावधीत शहरातील गोरगरीबांसाठी सुरू असणारी शिवभोजन थाळी, मोफत अन्नछत्र बंद राहणार आहेत...केवळ घरपोच अन्न सेवा देणार्‍यांना विशेष पासद्वारे परवानगी देण्यात येणारआहे...नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाई अटळ असा इशारा *अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधिक्षक बी. बी. महामुनी,यांनी पत्रकार परिषदेत दिला...

 यावेळी शिवाजीनगरचे पोलीस ठाण्याचे श्रीकांत पिंगळे, शहापूरचे पोलीस ठाण्याचे एस. एम. यादव गावभागचे पोलिस ठाण्याचे गजेंद्र लोहार, उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post