सतत मास्क परिधान केल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते का..?



नवी दिल्ली: देशात कोरोनाची साथ आली तेव्हापासून कोरोनासंबंधी दररोज काहीतरी नव्या आणि उलटसुलट गोष्टी कानावर ऐकायला येतात. अमुक-तमूक घरगुती उपायाने कोरोना बरा होतो, अमूक गोष्ट गेल्यास   कोरोना  वाढतो, तमूक केल्यास जीवाचा धोका उद्भवू शकतो, अशा अनेक अफवांचे पेवही फुटले आहे.

यामध्ये आता एका नव्या गोष्टीची भर पडली आहे. सध्या सोशल मीडियावर सतत मास्क परिधान केल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याचा एक मेसेज फिरत आहे. हा मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे.मात्र, कोरोनाविरुद्धच्या लढाईतील प्रमुख शस्त्र असलेल्या मास्कच्या वापराबद्दल प्रश्नचिन्ह

 काय आहे व्हायरल मेसेज?

मानवी शरीराला दिवसात 550 लीटर ऑक्सिजनची गरज असते. एरवी ही गरज सहजपणे पूर्ण होते. मात्र, मास्क परिधान केल्यास शरीराला फक्त 250 ते 300 लीटर ऑक्सिजनचाच पुरवठा होतो. तसेच मास्क लावल्याने शरीरातील कार्बनडायऑक्साईडची पातळीही वाढते. त्यामुळे मास्क घालणे धोकादायक ठरु शकते, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा मेसेज खोटा

हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोच्या  फॅक्ट टीमने याची पडताळणी केली. त्यानंतर या गोष्टी काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. मास्कचा वापर केल्यामुळे ऑक्सिजन पातळी खालावत असल्याचा मेसेज फेक आहे. असा कोणताही शास्त्रीय पुरावा आढळलेला नाही, असे प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने म्हटले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post