इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना अभिवादन



इचलकरंजी : 

इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवार दिनांक २१ मे  रोजी भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी  यांच्या स्मृती दिनानिमित्त  नगरपरिषद सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड.अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्व.राजीव गांधी यांचास्मृतीदिन दहशतवाद वहिंसाचार विरोधी दिन म्हणून साजरा करणेत येत असलेने  याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली.

          याप्रसंगी  जेष्ठ नगरसेवक शशांक बावचकर, राहुल खंजिरे,

उप मुख्य अधिकारी केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे,आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार,  जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे , शीतल पाटील, एम.एस. चाबुकस्वार, राजेंद्र आरगे, अभिजीत पटवा, उमेश पाटील, भारत कोपार्डे आदी  उपस्थित होते.


   

Post a Comment

Previous Post Next Post