हडपसर : मगर रुग्णालयामध्ये तुम्ही पहिल्यांदा कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन घेतली असे विचारून लसीकरण करणाऱ्या डॉक्टरांकडून नागरिकांना गोंधळात टाकले जात आहे.



पुणे :
 केंद्र आणि राज्य सरकार 45 वयोगटापुढील नागरिकांनी कोविडसाठीची लस घ्यावी, असा आग्रह धरत आहे. मात्र, महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने आज अनेक नागरिकांनी लस न घेताच घरी परतावे लागले. मगर रुग्णालयामध्ये तुम्ही पहिल्यांदा कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन घेतली असे विचारून लसीकरण करणाऱ्या डॉक्टरांकडून नागरिकांना गोंधळात टाकले जात आहे. अजून किती दिवस लस मिळविण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार नाही. ज्येष्ठ आणि अपंगांविषयी तरी थोडीफार आपुलकी असणे अपेक्षित आहे. मात्र, येथील डॉक्टर-कर्मचाऱ्यांमध्ये तो आपलेपणा दिसत नसल्याची तक्रार आज ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखविली.

सामान्य नागरिकांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन याविषयी काही घेणे देणे नामात्र, येथील अधिकारी-कर्मचारी शब्दखेळ करून पुन्हा त्यांना विचलित करीत आहेत. दीड महिन्यापूर्वी कोणती लस घेतली याविषयी लेखी दिले जात नाही. सकाळी तुम्ही जेवताना काय भाजी होती हे सायंकाळी विचारले तर आठवत नाही आणि दीड महिन्यापूर्वी कुठली लस घेतली हे कसे त्यांना आठवणार हाही अभ्यासाचा मुद्दा आहे. त्याविषयी तुम्ही कागदावर लिहून दिले असते किंवा तुमच्याकडे असणाऱ्या नोंदवहिमध्ये टिपण ठेवले असते तर बरे झाले असते. त्याविषयी तुमच्याकडेच कुठे नोंद नाही, तर नागरिकांकडे कशी असणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. दीड महिन्यापूर्वी लस घेतल्याची तुमच्याकडे नोंद नाही, असे तुम्ही कालपासून सांगत होता. मग आज अचानक दुपारी साडेबारा वाजता कशी सापडली. म्हणजे तुम्हाला कामाची पद्धती माहिती नाही किंवा काम करायचे नाही, असाच त्याचा अर्थ होत नाही का, असा स्पष्ट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. हडपसर गाडीतळ येथील बंटर बर्नाड स्कूलमध्ये पालिकेच्या वतीने लसीकरण सुरू केले आहे. मात्र, आज लस उपलब्ध नसल्यामुळे येथील केंद्र बंद ठेवले होते. ऑनलाइन पद्धतीने 20 आणि ऑफलाइन पद्धतीने 80 अशा पद्धतीने लसीकरण केले जात असल्याचे प्रवेशद्वारावर लिहिले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

माजी महापौर वैशाली बनकर म्हणाल्या की, बंटर बर्नाड स्कूल येथे लस येणार नसल्याने लसीकरण बंद ठेवले होते. तसा सूचना फलक प्रवेशद्वारावर लावला होता आणि नागरिकांना मोबाईलवर एस.एम.एस.द्वारे कळविले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रशांत सुरसे आणि महिला काँग्रेस कमिटीच्या महिला उपाध्यक्षा पल्लवी सुरसे म्हणाल्या की, कोविडची लस ऑनलाइन पद्धत योग्य आहे. सामान्य नागरिकांना लस मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. ऑनलाइन पद्धतीने ज्यांना नोंदणी करता येत नाही, त्यासाठी पालिका प्रशासनाने यंत्रणा उभी करणे अपेक्षित आहे. लस घेण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, हे पाहणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post