विविध योजनेअंतर्गत शिरोळ तालुक्याला ५ कोटी १८ लाखाचा निधी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर



जयसिंगपूर-

शासनाच्या विविध योजने मधून शिरोळ तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामांसाठी जवळपास ५कोटी १८ लाखाचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे,

जन सुविधा योजनेमधून १ कोटी ५० लाख, नागरी सुविधा योजनेअंतर्गत १ कोटी, क वर्ग तिर्थक्षेत्र विकास योजने मधून १ कोटी, अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास योजनेअंतर्गत १ कोटी, तसेच शिरोळ तालुक्यातील अंगणवाडी इमारत व उर्दू शाळा इमारत बांधकामासाठी ६८ लाखाचा निधी असा एकूण ५ कोटी १८ लाखाचा निधी प्राप्त झाले असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी सांगितले,

जनसुविधा योजने मधून ग्रामपंचायत जागेत ग्रामपंचायत इमारत बांधणे, अंतर्गत गटर्स, अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण, स्मशानभूमी निवारा शेड,नागरी सुविधा योजनेअंतर्गत शवदाहिनी, सार्वजनिक स्मशान भूमी शेड उभारणे, सांस्कृतिक भवन, तलाव सुशोभीकरण, सभा मंडप बांधणे, दफनभूमी कंपाऊंड, क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजने मधून विविध गावांमधील मंदिरांसाठी सभामंडप उभारणे,

अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजने मधून समाज मंदिर, अंतर्गत रस्ते व गटर्स बांधणे व त्याचबरोबर अंगणवाडी इमारत बांधकाम निधीतून शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, हेरवाड, व नवे दानवाड येथे एक तर टाकळी येथे दोन अशा पाच अंगणवाडी तसेच खिद्रापूर येथील उर्दू शाळेच्या तीन खोल्यांच्या इमारतींचे बांधकाम होणार असल्याचे ही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी म्हटले आहे,

अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीमधून पन्नास लाखाच्या निधीचा विनियोग तालुक्यासाठी तर उर्वरित पन्नास लाखाच्या निधीचा विनियोग हातकणंगले तालुका साठी केला असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले

विविध योजनेमधील या निधीचा विनियोग सर्व गावातील घटकांना मिळणार असल्याने या विकास कामांमुळे संबंधित अनेक गावांमधील अनेक वर्षाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत व नागरिकांच्या मागणीला न्याय मिळणार आहे असेही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेवटी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post