हुपरी येथे रिव्हॉल्वर साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने एक तरुण ठार , शहरात खळबळ उडाली



 हुपरी :  - हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील एक खळबळजनक प्रकार घडला आहे. रिव्हॉल्वर साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने एक तरुण ठार झाला आहे. सागर सुनिल गाट (वय, २७ रा. शांतीनगर) असे या मृत युवकाचे नाव आहे. या घटनेवरून शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, येथील शांतीनगर वसाहतीत सुनिल विद्याधर गाट हे चांदी उद्योजक आपल्या २ मुलांसह राहतात. चांदी व्यापारी सुनील गाट हे चांदी उद्योजक असुन चांदी दागिने घेऊन ते परराज्यात जातात. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी त्यांच्याकडे रिव्हाल्वर होती. त्या रिव्हॉल्वरने त्यांच्या पुत्राचा घात केला आहे. मुलगा सागर आपल्या त्यांचीच रिव्हॉल्वर साफ करीत अचानक त्यातील गोळी सुटून सागर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याने तत्पूर्वीच ते मृत्यूमुखी पडले होते. तर मृत सागर यांचा मुलगा सिध्द याचा आज (शनिवार) वाढदिवस होता. या घटनेने हुपरी शहर अधिक सुन्न झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून घटनास्थळी पीआय राजेंद्र म्हस्के, पल्लवी यादव, मस्कर आदी दाखल झाले असून, यावरून या घटनेची चौकशी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post