रेमडेसिवीरचा काळाबाजार करणा-या चोरांवर कठोर कारवाई करा.





  हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले

सध्या देशभरात कोरोना या महामारीमुळे अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत व रुग्ण संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यावर संजिवनी म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाविकास आघाडी रेमडेसिवीरची इंजेक्शन्स व लसीचा पुरवठा करण्यासाठी पराकष्टा करीत आहेत. जेणेकरुन महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळावा व महाराष्ट्र लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

अशा परिस्थिती मध्ये प्रेताच्या टाळुवरचे लोणी खाणारे महाचोर काळाबाजार करताना सापडले. आपणास विनंती आहे या काळाबाजार करणा-या नालायक लोकांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात आपण ठोस पावले उचलावित,आशी मागणी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा कोल्हापूर यांचेकडे करण्यात आली आहे.तसेच हे इंजेक्शन्स बाजारात कोणत्या वितरका मार्फत आले या चोरांपर्यंत पाठवणारे कोण डाॅक्टर आहेत? याचा कसून शोध व्हावा व संबंधितावर कठोर कारवाई होवून त्यांचे परवाने व पदवी रद्द करण्यात यावे अशी मागाणी करण्यात आली.

        यावेळी संजय पवार, शिवाजी जाधव , मंजित माने , हर्षल सुर्वे, सुजित चव्हाण, विशाल देवकुळे, अभिजित बुकशेट , प्रवीण पालव   उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post