नवे दानवाड (ता. शिरोळ) अंगणवाडी बांधकामासाठी 8 लाख 50 हजार निधी लोकनियुक्त सरपंच सौ. वंदना हरिश्‍चंद्र कांबळे यांची माहिती..



हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले 

नवे दानवाड (ता. शिरोळ) येथील अंगणवाडी क्र. 418 (गावठाण वाढीव वासात) नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी 8 लाख 50 हजार रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती गावचे लोकनियुक्त सरपंच सौ. वंदना हरिश्‍चंद्र कांबळे यांनी दिली.

     नवे दानवाड येथील अंगणवाडी क्रमांक 418 हा गेल्या अनेक वर्षापासून अंगणवाडी स्वतंत्र इमारत नसल्याने दुसऱ्या अडचणी ठिकाणच्या इमारती मध्ये भरत होत्या. इमारती बांधनेस ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या मालकीची जागा असून निधी उपलब्ध नसल्याने अंगणवाडी इमारत बांधकाम करणे अवघड झाले होते. त्यामुळे अंगणवाडी मध्ये येणाऱ्या चिमुकले मुले मुलींची फार मोठी गैरसोय होत होती. त्याची गरज लक्षात घेऊन गावचे लोकनियुक्त सरपंच सौ. वंदना कांबळे यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना शिरोळ क्रमांक 2 यांच्याकडे रीतसर प्रस्ताव सादर करून निधी मंजूर करून मिळण्यासाठी सातत्याने तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे अंगणवाडी क्रमांक 418 या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्याचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र मिळाले आहे. लवकरच पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष इमारत बांधकामाची सुरुवात केली जाणार आहे. ही निधी मंजूर कामे मार्गी लावण्यासाठी तत्कालीन खासदार राजू शेट्टी,नामदार राजेंद्र पाटील(यड्रावकर),श्रीमत भवानीसिंह घोरपडे सरकार (पंचायत समितीचे माजी उपसभापती), मा. पद्मिनी राणी पाटील (सभापती महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद कोल्हापूर),    व समाजभूषण हरिचंद्र कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे माहिती लोकनियुक्त सरपंच सौ. वंदना कांबळे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post