श्री.सुभाषरावजी पुजारी यांनी लुधियाना येथे झालेल्या पंजाब बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांचे वतीने आयोजित मास्टर भारत श्री २०२१ या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले .
आपल्या संस्थेचे मार्गदर्शक माजी पालक पनवेल येथे कार्यरत असि.पोलीस इन्स्पेक्टर रेंदाळ गावचे सुपुत्र व आमचे मित्र आदरणीय श्री.सुभाषरावजी पुजारी यांनी लुधियाना येथे झालेल्या पंजाब बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांचे वतीने आयोजित   मास्टर भारत श्री २०२१ या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले व त्यांची मालदिव येथे होणाऱ्या मास्टर आशिया श्री २०२१ बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली..

 सदर स्पर्धेसाठी निवड होणारे API श्री.सुभाषजी पुजारी हे *देशातील पहिले पोलीस अधिकारी*  आहेत.   त्यांच्या या यशाबद्दल व्यंकटेश शाळा परिवार हुपरी मार्फत त्यांचा सत्कार व शुभेच्छा देण्यासाठी समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यांचा सत्कार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय श्री.नानासाहेब गाट, कोल्हापूर जिल्हा व्हाॅलीबाॅल असोसिएशन हुपरी चे अध्यक्ष आदरणीय श्री.यशवंतदादा पाटील संस्था अध्यक्ष आदरणीय श्री.घनश्याम आचार्य, कोषाध्यक्ष श्री.राजेंद्र बापूसाहेब माळी, सचिव श्री.सुनिल कल्याणी , बालमंदिर विभाग प्रमुख मनिषाताई वारंग - रानमाळे, प्राथमिक विभाग प्रमुख कुंतीनाथ गंगाई, माध्यमिक विभाग प्रमुख किरण नाईक सर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

स्वागत महेशकुमार कोरे सर यांनी केले, प्रास्तावीक सुनिल कल्याणी यांनी केले, यावेळी यशवंतदादा पाटील व राजेंद्र माळी  यांनी मनोगत व्यक्त केले , सत्कार मुर्ती  आदरणीय श्री सुभाषराव पुजारी यांनी आपल्या दिलखुलास शैलीत आपला जिवनपट कथन केला व विद्यार्थ्यांच्या मनात आपण ही कांहीतरी बनलं पाहिजे ही प्रेरणा निर्माण केली. शेवटी आभार कुंतीनाथ गंगाई सर यांनी मानले.

Post a comment

0 Comments