सरकार वाचवण्याचं सोडा, जनतेचे हाल थांबवा. राज ठाकरे.

 

मुंबई :
 आज भांडुप येथील सनराईज या कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे हे रुग्णालय मॉल मध्ये असल्याने पालिकेच्या आणि ठाकरे सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आणि याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ‘ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

भांडुप येथील हॉस्पिटल मध्ये लागलेल्या आगीत परत एकदा निष्पाप ११ जणांचे बळी गेले. ‘सरकार स्थिर आहे की नाही यात जनतेला अजिबात रस नाही, जनतेचे हाल, गैरसोय, मृत्यू कधी थांबणार हे जनतेला जास्त महत्वाचे आहे”, असं म्हणत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘ठाकरे’ सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

नांदगावकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज तिथे जाऊन परिस्थिती ची पाहणी केली. जानेवारीत सुद्धा अशाच जळीतकांडात भंडाऱ्यात अनेक निष्पाप बालकांचे जीव गेले. इथे वरचेवर अशा घटना घडत असतात व काही काळाने आपण विसरून जातो कारण या घटनेत कोणा “व्हीआयपी” चा जीव नाही गेला, प्राण गमावलेले सर्व हे सामान्य होते. सत्ता हि जनतेच्या भल्यासाठी राबवायला हवी परंतु हे न होता सत्तेची मस्ती हि पावलोपावली दिसत आहे. सरकार या गोष्टी अतिशय हलक्यात घेत आहे व या बद्दल ठोस पाऊले उचलून पुनरावृत्ती न थांबवता येऊन जाऊन आमचे सरकार स्थिर आहे, अशी मुलाखत ऐकायला मिळते.Post a comment

0 Comments