रुपाली पाटील व वसंत मोरे यांनी सहाय्यक आयुक्त किशोरी शिंदे यांच्या विरोधात ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात देण्यात आली.पुणे  : वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या टेबलावर कचरा टाकल्या प्रकरणी नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या १५ कार्यकर्त्यांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याला प्रतिउत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला शहर अध्यक्ष रुपाली पाटील व वसंत मोरे यांनी सहाय्यक आयुक्त किशोरी शिंदे यांच्या विरोधात ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या बाबत ची माहिती अशी की प्रभाग क. २७ कोंढवा मिठानगर हा पुणे शहरातील मोठा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये गेली कित्येक महिने कचऱ्याची समस्या निर्माण झालेलीपरंतु पुणे मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. व सहाय्यक आयुक्तांनी आपली जबाबदारी ओळखुन काम केले नाही. सध्या पुणे शहरात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच साथीच्या रोगाने या भागात अनारोग्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे परिसरातील नागरीकांनी स्थानिक नगरसेवक साईनाथ बाबर यांना भेटुन आपल्या तक्रारी सांगितल्या त्यामुळे साईनाथ बाबर यांनी संबधित सहाय्यक आयुक्त यांना फोनवरून विचारणा केली असता मी बाहेर आहे. मी आता भेटु शकत नाही.असे उत्तर दिले म्हणून स्वतः बाबर व त्यांचे कार्यकर्ते सहाय्यक आयुक्तांना भेटण्यासाठी ऑफीसमध्ये गेले त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा उडवा उडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे बाबर यांनी त्याच कार्यालयाच्या आवारात साठलेला कचरा त्यांच्या ऑफीसमध्ये टाकुन आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्यावर कलम ३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका नागरीकांकडून कचरा उचलण्यासाठी घरटी ६० ते ७० रूपये स्वच्छ या संस्थेच्या माध्यमातुन घेतात.त्या शिवाय पुणे महानगरपालिका जो टॅक्स घेते त्यामध्ये सफाईकरच्या माध्यमातून टॅक्स वसुल केला जातो व प्रत्यक्षात जागेवरती कुठलेही काम केले जात नाही. पैसे घेवुन नागरीकांची एक प्रकारची दिशाभुल आहे.

त्यामुळे संबधित सहाय्यक आयुक्तांच्या विरोधात कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच कलम २६८ मधील सार्वजनिक उपद्रव यामध्ये कलम २६९, कलम २७० नुसार नागरीकांच्या जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयची कृती करणे या नुसार संबधित सहाय्यक आयुक्त त्या वॉर्ड ऑफीसमधील आरोग्य अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत.

अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपुर्ण शहरभर या विरोधात आंदोलन ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला शहर अध्यक्ष रुपाली पाटील व वसंत मोरे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Post a comment

0 Comments