माहितीसाठी


 पुणे : संदेश लायब्ररीचे संस्थापक मा.शेख सलीम यांचा 15/3/2021 रोजी कोरोना या आजाराने मृत्यू झाला. शेख सलीम हे संदेश लायब्ररीच्या माध्यमातून त्यांनी गेल्या वीस वर्ष समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रभर त्यांनी काम केले.संदेश लायब्ररीच्या माध्यमातून त्यांनी संत-महात्मे विचारवंत आणि इस्लाम, स्वतंत्र संग्रामात मुस्लिमांचे योगदान, दिव्य कुराण आणि आधुनिक विज्ञान,यासारखे अनेक पुस्तक त्यांनी लिहून समतेचा संदेश देण्याचे कार्य केले. 

नुकताच त्यांचा निधन झाल्याने स्थानिक भागातील इतर समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी केलेल्या कामाचा गौरव व सलीम शेख यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्वतः शेख सलीम यांनी बनविलेले अनेक पोस्टर्सचे व बॅनर्सचे प्रदर्शन आयोजित केले आहे.दृष्टी विज्ञानाचा प्रणेता, आधुनिक औषधाचे जनक, रसायन शास्त्राचे जनक, शस्त्रक्रियेचे जनक, पृथ्वी गोलाची मोजणी, जगातील पहिले उडान, मुंग्याचे जीवन, वनस्पती, पाणी, लोखंड, दिवस रात्रीचे चक्र, न्याय, समता, दारू आणि जुगार, व्याज देणे घेणे निषिद्ध (हराम)नि र्णय आपल्या हाती.

अशा 100 हून अधिक पोस्टर्स बॅनर्स

लावून संदेश लायब्ररीच्या कार्यकर्ते व रहिवाश्यांनी शेख सलीम यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोस्टर्स लावले आहेत.या प्रदर्शन मध्ये समता,बंधुत्व,राष्ट्रीय एकात्मतासाठी काम करणारे असंख्य सामाजिक कार्यकर्ते  प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट देणार आहे व आपले विचार ही व्यक्त करणार आहेत .आज शुक्रवार दिनांक 26 मार्च 2021 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 9

स्थळ: शिवाजी नगर वाकडेवाडी भारत पेट्रोल पंप समोर बोडके शाहवली मस्जिद वाकडेवाडी.तरी या प्रदर्शनामध्ये आपण किंवा आपला प्रतिनिधी पाठवावे ही विनंती.

अधिक माहितीसाठी संपर्क करा अंजुम इनामदार

9028402814

Post a comment

0 Comments