पुण्यातील कंन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाच्या अधीक्षकांचा अपघाती मृत्यूपुणे - पुण्यातील कंन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाच्या अधीक्षकांचा अपघाती मृत्यू झाला. प्रकाश हसबे यांनी सकाळी पुण्यातील फॅशन स्ट्रीट बाजारपेठेत लागलेल्या आगीचा आढावा घेतला. त्यानंतर घरी परत जात असताना त्यांना पीएमपी बसने धडक दिली. या अपघातात कसबे यांचा जागीच मृत्यू झाला. येरवड्यातून विमानतळाकडे जात असताना हा अपघात घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल रात्री उशिरा फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये आग भडकली. ही आग आटोक्यात येण्यासाठी बराच वेळ गेला. आग लागल्याची माहिती समजताच प्रकाश हसबे हे घटनास्थळी दाखल झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सकाळी घटनेचा आढावा घेऊन हसबे घरी परत जात होते.कर्मचाऱ्यांना दोन तासात परत येतो असं सांगून घरी जात असताना त्यांना पीएमपी बसने धडक दिल्याची माहिती समजते. प्रकाश हसबे यांच्या निधनाचे वृत्त पुणे कन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.

पुण्यातील कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीट एरियामध्ये आग लागल्याची घटना घडली. या भागात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत होत्या. लष्कर परिसरातील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट येथे शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजता भीषण आग लागली होती. लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्ता येथील फैशन स्ट्रीट तरुणाईचे कपडे व विविध वस्तु खरेदीसाठीचे आवडते ठिकाण आहे. 

Post a comment

0 Comments