महिला दीन विशेष : बारामती शहरातील रुई येथील प्रभाग चारमधील कार्यतत्पर, कार्यक्षम नगरसेविका, महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. सुरेखा पांडुरंग चौधर यांनी आपल्या रचनात्मक विकासकामांतून सर्वसामान्यांशी नाळ जोडली आहे....... उपमुख्यमंत्री अजितदादा पवारबारामती : बारामती शहरातील रुई येथील प्रभाग चारमधील कार्यतत्पर, कार्यक्षम नगरसेविका, महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. सुरेखा पांडुरंग चौधर यांनी आपल्या रचनात्मक विकासकामांतून सर्वसामान्यांशी नाळ जोडली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या विकासात्मक आराखड्याला साजेसे काम चौधर यांनी केले आहे. प्रभाग चारमध्ये त्यांनी नागरिक, महिला, सर्वसामान्य घटक आदींशी कनेक्‍ट राहून कायापालट केला आहे. महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदाच्या कार्यकाळात त्यांनी प्रभागासह शहरातील सर्वसामान्यांना मदतीचा आधार दिला होता. शहरी आणि ग्रामीण भागातील नस ओळखून त्यांनी लोकसहभागातून खास महिला दिनानिमित्त त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा घेतलेला आढावा..

बारामती शहरातील रुई येथील प्रभाग चारमधील कार्यतत्पर, कार्यक्षम नगरसेविका, महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. सुरेखा पांडुरंग चौधर यांनी आपल्या रचनात्मक विकासकामांतून सर्वसामान्यांशी नाळ जोडली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या विकासात्मक आराखड्याला साजेसे काम चौधर यांनी केले आहे. प्रभाग चारमध्ये त्यांनी नागरिक, महिला, सर्वसामान्य घटक आदींशी कनेक्‍ट राहून कायापालट केला आहे. महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदाच्या कार्यकाळात त्यांनी प्रभागासह शहरातील सर्वसामान्यांना मदतीचा आधार दिला होता. शहरी आणि ग्रामीण भागातील नस ओळखून त्यांनी लोकसहभागातून विकासाभिमुख कायापालट केला आहे. खास महिलादिनानिमित्त त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा घेतलेला आढावा..

शब्दाला जागणाऱ्या नगरसेविका -

रुई ग्रामपंचायत असताना विकासकामांना मर्यादा होत्या. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारवरील अवलंबित्व होते. परंतु बारामती हद्दवाढ क्षेत्रात रुईचा समावेश झाल्यानंतर मात्र, विकासकामांना गती आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून नगरसेविका सुरेखा चौधर यांनी नागरिकांना दिलेला शब्द पाळत एक कोटी 85 लाख रुपये खर्च करून प्रभागात 100 टक्‍के डांबरीकरण केले आहे. नगरसेविकापदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून दिलेला शब्द खरा करून दाखविला आहे. त्या खऱ्या अर्थाने शब्दाला जागणाऱ्या नगरसेविका म्हणून परिचित आणि लौकीकप्राप्त झाल्या आहेत.

आरोग्यासाठी सजग असलेल्या सभापती -

महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी संधी मिळाल्यानंतर महिलांच्या विविध प्रश्‍नांसाठी सुरेखा चौधरी यांनी परिश्रम घेतले होते. महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी पॅडमॅन हा चित्रपट महिला तसेच महाविद्यालयीन युवतींना मोफत दाखविला होता. जेणेकरून त्यांनी सामाजिक
बांधिलकीचा उपक्रम राबविला. राज्य शासनाच्या पल्स पोलिओ, विविध लसीकरणात सहभाग घेऊन बुथवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी आपलेपणाची वागणूक दिली. दिव्यांग लाभार्थी व महिला बचत गटांना फिरता निधी वाटप तसेच महिला बचत गटांना चारचाकी वाहन परवान्यांचे वाटप केले आहेत.

अजितदादांना अभिप्रेत सन्मानगाथा -

महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती, नगरसेविका चौधर यांनी विकासकामांबाबत एक व्हिजन ठेवले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 'स्वच्छ सुंदर व हरित बारामती'चा ध्यास घेतला आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या या संकल्पाला साथ देत रुई गावात स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण गाव स्वच्छ
केले. वृक्षारोपण देखील करण्यात आले याची दखल घेत अजितदादा यांच्या हस्ते नगरसेविका सुरेखा चौधर तसेच त्यांचे पती राष्ट्रवादीचे नेते पांडुरंग चौधर यांचा विशेष सन्मान करण्यात आला आह

भुयारी गटार योजना, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवला
रुईचा समावेश बारामती नगरपरिषदेत झाल्यानंतर भुयारी गटारीचा प्रश्‍न होता. चौधर यांनी केलेला पाठपुरावा आणि तडीस नेण्याची हातोटी जोरावर भुयार गटार योजनेचा प्रश्‍न मार्गी लागला. एक कोटी 80 लाखांचा निधी खर्च झाला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौधर यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तत्परतेने सोडविला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न त्यांनी तत्परतेने सोडविला आहे. 12 लाख 57 हजार लिटर असलेली पाण्याची टाकी रुईमध्ये उभारली आहे. त्यासाठी एक कोटी 69 लाखांचा निधी उपलब्ध केला आहे.

ड्रोनच्या सहाय्याने गावाची मोजणी
रुईमधील शेती, घर, बंगला आदींची रितसर सर्व कायदेशीर मोजणी होण्यासाठी शासनाच्या भूमिअभिलेख खात्याकडे वारंवार पाठपुरावा करून भूमिअभिलेख खात्याच्या सहकार्याने ड्रोनच्या माध्यमातून गावाची मोजणी केली. पती पांडुरंग चौधर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. हद्दवाढ झाल्याने नागरिकीकरण वाढले. गावात स्मशानभूमीची सुविधा नसल्याने अंत्यविधीसाठी नागरिकांचे हाल होत होते.

अंत्यविधीसाठी सहा किलोमीटर अंतरावर न्यावे लागत. अंत्यविधीसाठी सुरू असलेल्या जागेचा वाद मिटवून 68 लाखांचा निधी दिला आहे. सभापतिपदाच्या कालावधीतील उल्लेखनीय कामे सभापतिपदाच्या कालावधीतील चौधर यांनी प्रतिभा महिला प्रशिक्षण योजना, पल्स पोलिओ लसीकरण, जागतिक महिला दिन, दिव्यांगांसाठी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत बचत गट निधी वाटप, महिलांना कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी सहकार्य, फेरीवाल्या महिलांसाठी उपक्रम व मदत, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली आहे. 

Post a comment

0 Comments