जालना जिल्ह्यत लाॅगडाऊन करू नये - वंचित बहुजन आघाडीची मागणी अंबड तहसीलदारादांना निवेदन

अंबड / प्रतिनिधी : जालना जिल्ह्यात कोरोणाच्या पार्श्वभुमीवर लाॅगडाऊन करू नये, मागिल वर्षात गोरगरीब जनतेचे खूप हाल झाले, लाॅगडावून पुर्वी सरकरणे जनतेला सर्व आवश्यक सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात नसता आम्ही लाॅगडावून तोडू असा अक्रमक इशाराही वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज तहसीलदार श्री विद्याचरण कडवकर यांना लेखी निवेदन देवुन देण्यात आले.

सदरील निवेदन हे मा.जिल्हाधिकारी जालना यांना तहसीलदार अंबड मार्फत देण्यात आले, यावेळी वंचित बहुजन आघाडी पुर्वचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने, उपाध्यक्ष सतीश खरात, जिल्हा निरीक्षक विष्णूकुमार शेळके, महासचिव परमेश्वर गाडेकर, जिल्हा प्रवक्ता सुभाष ससाने, जिल्हा संघटक चंद्रकांत कारके, गोवर्धन जाधव, तुकाराम धाईत, आप्पा झाकणे, परमेश्वर खरात,अंबादास जाधव, नामदेव वैद्य,रामेश्वर तोगे, विकी डोंगरे, कृष्णा पवार, सुनिल खरात, घनसांगी तालुका अध्यक्ष लहु धाईत, शहराध्यक्ष अशोक साळवे, उपाध्यक्ष अतिश खरात, रविंद्र भोसले, संतोष राऊत, सिद्धार्थ लिहिणार, शंकर भागवत, मधुकर मस्के, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पोलिस निरीक्षक हुंबे यांनाही अशा आशयाचे एक निवेदन देण्यात आले, यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्स चे यावेळी पालन करण्यात आले.

Post a comment

0 Comments