रात्रीची संचार बंदी पुणे महानगरपालिका हद्दीत कायम ठेवण्यात आली आहे पुणे शहारातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच राहणार



 पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून रात्रीची संचार बंदी पुणे महानगरपालिका हद्दीत कायम ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा, शिफ्टमध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे. तर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु राहणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णय पुन्हा वाढवण्यात आला असून, पुणे शहारातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून याची माहिती दिली. 'शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच ठेवणार!पुणे महानगरपालिका हद्दीत करोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग १४ मार्च २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल,' अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post