बेडकिहाळ ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा

अध्यक्षपदी मेघा मोहीते तर उपाध्यक्षपदी स्वाती कांबळे यांची निवड

      बेळगांव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :

    बेडकीहाळ  ग्रा.पं मध्ये अध्यक्षपदासाठी एकूण तीन अर्ज भरले होते. त्यातील दोन सदस्यांनी आपला अर्ज माघार घेतल्याने  मेघा मोहीते यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी स्वाती कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

   अध्यक्ष स्थानी मेघा धनंजय मोहीते तर उपाध्यक्षपदी स्वाती शिरीष कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. एम.आर.कोतवाल यांनी निवडणूक अधिकारी म्हनुन काम पाहीले.  बेडकिहाळ ग्राम पंचायतीवर महिलाराज  आले आहे. 

  यावेळी सन्मानिय जेष्ठ नेते गोपाळदादा पाटील ग्रां. पं. नुतन अध्यक्षा मेघा मोहीते उपाध्यक्षा स्वाती कांबळे यांनी गावाच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहु असे म्हनाल्या. यावेळी ग्राम विकास अधिकारी अशोक झेंडे जिल्हा अध्यक्ष विक्रम शिंगाडे, ग्राम पंचायत सदस्य दत्तकुमार पाटील, जीवन यादव, प्रमोदकुमार पाटील, महादेवी यादव, जयश्री यादव, आस्मा मुल्ला, श्रेयांश पाटील, मनोज जाधव,  सविता पाटील, निर्मला कोळी, श्रीदेवी चौगुले, वनिता पाटील, तात्यासाहेब धड्डपाटील,  पोर्निमा चिंचने, प्रशांत पाटील, सुरेश सुतार, सचिन पाटील, विद्दा देशाई, शिवानंद बिजले, शोभा सुतार, गंगाधर सुर्यवंशी, सुवर्ना बत्ते, अब्दुलहान जुनेदीपटेल तसेच सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते, महिला उपस्थित होते.  

   गुलालाची उधळण, बेंजो तसेच फटाक्यांच्या आतीषबाजीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.

Post a comment

0 Comments