विमानतळ पोलिसांनी एका आलिशान सोसायटीच्या माजी सुरक्षा रक्षकास जेरबंद केले ..PRESS MEDIA LIVE : पुणे :


पुणे - एका घरफोडीच्या गुन्हयाचा तपास करताना विमानतळ पोलिसांनी एका आलिशान सोसायटीच्या माजी सुरक्षा रक्षकास जेरबंद केले आहे. त्याने सोसाटीतील बंद सदनिका फोडून तब्बल 25 तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. त्याच्याकडून 20 तोळ्याचे दागिने(10 लाख रुपये किंमत) हस्तगत करण्यात आले आहेत. त्याने हा गुन्हा साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सुरक्षा रक्षक संतोष उर्फ लारा काशिनाथ जाधव(35,रा.लोहगाव) व त्याचासाथीदार संतोष उर्फ रॉकी अरुण धनवजीर(34,रा.लोहगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी चोरीचे दागिने विकलेल्या अशोक गणेशलाल जानी(54,रा.शनिवार पेठ, सातारा) याला विकले होते.

Post a comment

0 Comments