काँग्रेस च्या बाले किल्याला खिंडार,शिवसेना विजयीपुणे : पुणे शहरा पासून अवघ्या 15 कि.मी अंतरावर असणाऱ्या भोर तालुक्यातील कुसगाव या गावचा कोणत्याही प्रकार चा विकास गेली 35 ते 40 वर्षे एकहाती सत्ता असताना न झाल्यामुळे मतदारांनी एक मताने शिवसेनेच्या असणाऱ्या श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनल च्या हाती दिलेला आहे.विशेष म्हणजे श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांनी आता गावात येणारा मेन रस्ता ,गावातील अंतर्गत रस्ते ,पाणी पुरवठा ,ड्रेनेजलाईन ,आरोग्य ,व शैक्षणिक,गोष्टीवर लक्ष्य केंद्रीत करून सर्व विकास कामे प्रगती पथावर करण्याचे ठरविले आहे.श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या विजयासाठी श्री कुलदीप तात्या कोंडे(पुणे जिल्हा सह-संपर्क प्रमुख ),यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड श्री निखिल संजय  कोंडे ,श्री संतोष शिंदे,श्री दिलीप आबा तांबट, श्री हनुमंत गेनबा मांढरे,(मा.उपसरपंच),श्री संभाजी कोंडे, शंकर दत्तात्रय मांढरे,शोभाबाई शंकर मांढरे,समिंदराबई शंकर मांढरे,संतोष कोंडे,नंदकुमार रामचंद्र भालघरे,विघ्नहर्ता तरुण मंडळ, काळभैरवनाथ तरुण मंडळ ,राजमुद्रा मित्र मंडळ,जय गणेश मित्र मंडळ,श्रीनाथ मित्र मंडळ, छावा ग्रुप,शिवशंभो  मित्र मंडळ  यांचे सहकार्य लाभले.

Post a comment

0 Comments