पुणे : आरोपी बरोबरच बैठक करणाऱ्या चंदननगर पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदार निलंबित

 आरोपी बरोबरच बैठक करणाऱ्या चंदननगर पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदार निलंबित.

PRESS MEDIA LIVE : पुणे : 

आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून केल्याप्रकरणी गुन्ह्यातील मुख्यसुत्रधार व इतर संशयीत आरोपीबरोबर बैठक करणा-या चंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. परमेश्वर तुकाराम सोनके असे निलंबित केलेल्या हवालदाराचे नाव आहे.

हि घटना ५ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एसबीआयच्या प्रवेशद्वाराजवळ घडली बावधनमधील जमिनीचा निकाल कानाबार यांच्या बाजूने लागणार असल्याचा अंदाज असल्याने आरोपींना हा गुन्हा केल्याचे दिसून आले होते. विश्वास दयानंद गंगावणे (वय ३२, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. खुनासाठी राजेश शामलाल साळुंके (वय ३८, रा. सुखसागरनगर, कात्रज) याने मारेक-याला पिस्तुल आणि काडतुसे पुरविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचा साथीदार राकेश रमेश बुरटे (वय ३६, रा. जनता वसाहत, पर्वती. मूळ रा. रत्नागिरी) खुनाचे मुख्य सुत्रधार आहे.

त्यांच्यासह सनी अशोक वाघमारे (वय २६, रा. वाघोली), रोहीत विजय यादव (वय १९, रा. सुखसागर नगर, कात्रज), गणेश ज्ञानेश्वर कुNहे (वय ३६), राहुल आनंदा कांबळे (वय ३६), रुपेश आनंदा कांबळे (वय ३८), हसमुख जसवंतभाई पटेल (वय ३१) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्ह्यातील आरोपी राजेश साळुंके, राकेश रमेश बुरटे रोहीत विजय यादव यांच्यासोबतर पोलिस हवालदार परमेश्वर सोनके हा चंदनगर येथील एका हॉटेलमध्ये बैठकीस बसल्याचे सीसीटिव्हीच्या फुटेजवरून निष्पन्न झाले आहे. आरोपी आणि सोनके हे त्याठिकाणी बसल्याबाबत साक्षीदारांकडून दुजोराही देण्यात आला. सर्वजण घटनेनंतर ५ ऑक्टोबरच्या रात्री ९.३० वाजता गप्पा मारत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हवलदार सोनके याच्या संपर्कात आरोपी आले असतानाही, त्याने आरोपींना पोलिसांसमोर हजर न करता कोणतीही माहिती दिली नाही. सोनके याने आरोपींना मदत करण्याच्या हेतूने कृत्य केल्याने, पोलिस दलाची शिस्त मलीन केल्याने, पोलिस शिस्तीस बाधा आणणारे असल्याने आरोपींना मदत करणारे असल्याने निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाने गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आले आह


 


Post a Comment

Previous Post Next Post