पुण्यात कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनात प्रवास करताना मास्क वापरण्याची गरज नाही , ही सवलत फक्त खासगी वाहनांसाठी .




 पुणे : पुण्यात कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनात प्रवास करताना मास्क वापरण्याची गरज नाही. ही सवलत फक्त खासगी वाहनांसाठी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉलला झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.मात्र पुण्यात आता खाजगी वाहनातून प्रवास करताना मास्क वापरण्याची सक्ती असणार आहे. मोटारीच्या काचा बंद असतात, एकाच कुटुंबातील अथवा निकटच्या संपर्कातीलच माणसे एकत्र प्रवास करीत असतात. गाडीच्या काचा बंद असल्याने त्याचा इतरांना काहीही धोका नसतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.

महापौर मुरलीधर मोहळ म्हणाले, कुटुंबियांसोबत चारचाकी वाहताना पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात.

एकट्या पुणे शहरातच असे 28 हजारांवर नागरिक आहेत. राज्याचा विचार केला तर हा आकडा काही लाखांत आहे. त्यामुळे मानवतावादी भूमिका घेऊन कलम 188 नुसार पाठविण्यात आलेल्या नोटीसा रद्द कराव्यात, अशी मागणी गृह मंत्र्यांकडे केली आहे. गृह मंत्र्यांनी गृह विभागाच्या सचिवांशी चर्चा करून राज्य पातळीवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post