शाहिनबागच्या धर्तीवर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी (दि.27) किसानबाग आंदोलन करण्यात आले.पिंपरी -
 दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहिनबागच्या धर्तीवर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी (दि.27) किसानबाग आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या या आंदोलनामध्ये मुस्लिम बांधवांचा लक्षणीय सहभाग होता.

वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे व महिला शहराध्यक्षा लता रोकडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या भुमिकेचा निषेध करत, विरोधी घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात माजी नगरसेवक अंकुश कानडी, रहिम सय्यद, शारदा बनसोडे, गौरी शेलार, के.डी. वाघमारे, गुलाब पानपाटील,अतुल भोसले, सुनील गायकवाड, राजन नायर, अमित सुरवसे, चंद्रकांत गायकवाड, बाबुराव फुलमाळी, किरण हिंगणे, जगन्नाथ कांबळे आदी सहभागी झाले होते.

Post a comment

0 Comments