आज पासून सुरू होत आहे.


जगातील सर्वात मोठा लढा आज पासून सुरू होत आहे.



 मुंबई : जगातील करोनासोबतचा सर्वात मोठा लढा आजपासून सुरू होत आहे. आघाडीच्या करोना योद्धयांची लसीकरण मोहीम आजपसून सुरू होत आहे. सुरवातीच्या टप्प्यात तीन कोटी जणांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या दोन लसी देण्यात येणार आहेत. त्यानंतर प्राधान्य गटांचे लसीकरण करण्यात येईल. देशभर पहिल्या दिवशी देशभर सुमारे तीन लाख करोना योद्धय़ांच्या लसीकरणाचे लक्ष्य आहे. लसीकरणासाठी १०७५ हा मदतसेवा क्रमांक २४ तास कार्यरत असेल.

दरम्यान, राज्यात शनिवारी २८५ केंद्रांवर करोना लसीकरण मोहीम सुरू होणार असून पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेचा प्रारंभ जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईत कूपर रुग्णालयात शनिवारी सकाळी साडे दहात्यानंतर राज्यातील २५८ केंद्रांवर लसीकरणास सुरुवात होईल. राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील वांद्रे-कुर्ला करोना आरोग्य केंद्रात करणार आहेत.

दररोज सकाळी नऊ ते पाच या वेळेत लसीकरण केले जाईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील तीन कोटी करोना योद्धय़ांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पन्नाशीवरील व्यक्ती आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येईल. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील करोनायोद्धांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. मात्र, सामान्यांच्या लशींच्या खर्चाबाबत सरकारने अद्याप स्पष्टीकरण केलेले नाही. देशात शनिवारपासून सुरू होणारी ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ लसीकरणासाठी ३१ तारीख निश्चित केली आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post